Events

मार्च २०२५ शालांत परीक्षेचे निकाल आज जाहीर झाले. विजय शिक्षण संस्थेच्या, प्रगती विद्यालयचा 100 टक्के रिझल्ट लागला ! शालांत परीक्षा दिलेले सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी पास झाले आहेत. कु. अयान शेख याने ८२.४० % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी ,सर्व शिक्षक व कर्मचारी आणि संस्थेचे पदाधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन!💐💐 ... See MoreSee Less
View on Facebook
शालांत परीक्षेत विजय शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालय कर्णबधिरांसाठी दादर ( पूर्व ) येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!!शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये साधना विद्यालयातील मराठी माध्यमातील ९ विद्यार्थी व हिंदी माध्यमातील ४ विद्यार्थी यांनी दहावी परीक्षा मार्च २०२५ ला दिली. शाळेतील हे एकूण १३ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. शाळेचा निकाल १००% लागला आहे.कु.वेदिका खेतान ही विद्यार्थिनी ८०.४०% गुण मिळवून मराठी माध्यमातून पहिली आली आहे.कु. अल्फिया शेख ही विद्यार्थिनी ७९.२०% गुण मिळवून हिंदी माध्यमातून पहिली आली आहे.मुख्याध्यापक,सर्व शिक्षक , कर्मचारी वर्ग, पालक, विद्यार्थी व संस्था पदाधिकारी यांच्या अथक परिश्रमाने हे यश मिळाले आहे. सर्वांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!! ... See MoreSee Less
View on Facebook
विजय शिक्षण संस्थेचे, कर्णबधिरांसाठी प्रगती विद्यालय, दादर (प), येथे हिंदी आणि मराठी या दोन्ही माध्यमां साठी कर्णबधिर मुलांना प्रवेश देणे सुरू आहे. शाळेची वैशिष्ट्ये उपलब्ध सेवा, सुविधा आणि संपर्क क्रमांक,खालील माहितीपत्रकावर नमूद आहे. ... See MoreSee Less
View on Facebook
विजय शिक्षण संस्थेचे कर्णबधिरांसाठी प्रगती विद्यालय, दादर (प), आणि अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन), यांच्या संयुक्त विद्यमाने, दिनांक २३ एप्रिल ते २५ एप्रिल २०२५ , असे तीन दिवस "Basic communication in Indian sign language (ISL)" या विषयावर, प्रगती विद्यालयामध्ये CRE कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिव्यांगांच्या वेगवेगळ्या शाळेतून 45 शिक्षकांनी यात सहभाग घेतला होता. श्रीमती. आरती उमरोतकर, श्रीमती. सोना चौधरी व श्री. आशिष सोनकर यांनी सहभागी शिक्षकांना ISL चे उत्तम मार्गदर्शन केले, प्रात्यक्षिक करून घेतले. सर्वांच्या सक्रिय सहभाग आणि सहकार्याने हा CRE यशस्वीरित्या पार पडला. सर्व आयोजक, मार्गदर्शक, आणि सहभागी शिक्षकांचे मनःपूर्वक आभार! ... See MoreSee Less
View on Facebook
प्रगती विद्यालयामध्ये, वार्षिक परीक्षा संपल्यानंतर, दिनांक २१ ते २५ एप्रिल २०२५ या कालावधीत विविध छंदवर्गांचे आयोजन करण्यात आले होते. १) कला शिक्षक श्री. कांबळे सर व श्री. पिचड सर यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिकच्या रंगीत बाटल्या पासून सजावटीसाठी झाडे तयार करण्यास शिकविले आणि पणत्या सुशोभित करून घेतल्या. २) संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान तर्फे श्रीमती ललिता अडप व श्रीमती सुषमा कद्रेकर यांनी विद्यार्थ्याकडून टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ / शोभेच्या वस्तू, फुले तयार करून घेतली. विशेष शिक्षक सौ. मानसी शिंदे यांनी या छंदवर्गाचे नियोजन व आयोजन केले होते. ३) छोट्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून ही वर्गशिक्षकांनी हस्तकलेच्या वस्तू आणि पॉट पेंटिंग करून घेतले. उन्हाळी सुट्टीचा कार्यात्मक उपयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांना या छंदवर्गाचा नक्कीच फायदा होईल. ... See MoreSee Less
View on Facebook